Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
थोडक्यात महत्त्वाची बातमी..
"माझी लाडकी बहीण" योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात..
“महायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यापुढेही प्रभावीपणे राबवली जाणार आहे.” : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे .
मुंबई : सोशल मीडिया
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेअंतर्गत मे महिन्याचा सन्मान निधी आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती देत सांगितले की, आधार लिंक बँक खात्यात हा हप्ता थेट जमा केला जात आहे.
जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेत आर्थिक दुर्बल महिलांना दरमहा ₹1500 दिले जातात. एप्रिलपर्यंत 10 हप्ते वितरित झाले होते. मे महिन्याचा 11 वा हप्ता वेळेत न मिळाल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, छाननी प्रक्रियेनंतर पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यातच हा हप्ता जमा करण्यात येत आहे.
अदिती तटकरे म्हणाल्या, “महायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यापुढेही प्रभावीपणे राबवली जाणार आहे.” महिलांनी आपले बँक खाते तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रिपोर्टर