Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
थोडक्यात महत्वाची माहिती..
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभाग आणि रस्ते व वाहतूक विभागामार्फत मुंबई महानगरात विविध कामे सुरू आहेत. या अनुषंगाने, जोरदार पावसावेळी शहर विभागात आणि पूर्व उपनगरांमध्ये पाणी साचण्याची संभाव्ये ठिकाणे तसेच रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी पाहणी केली.
श्री. गगराणी यांनी एफ दक्षिण विभाग कार्यालय परिसरातील नागरी सुविधा केंद्रास भेट दिली. तसेच , प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त यांनी नियमितपणे नागरी सुविधा केंद्रास भेट देऊन कामकाजाचा आढावा घ्यावा, अशी सूचना देखील श्री. गगराणी यांनी केली.
मुंबई : संदिप शांताराम शिंदे.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभाग आणि रस्ते व वाहतूक विभागामार्फत मुंबई महानगरात विविध कामे सुरू आहेत. या अनुषंगाने, जोरदार पावसावेळी शहर विभागात आणि पूर्व उपनगरांमध्ये पाणी साचण्याची संभाव्ये ठिकाणे तसेच रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी पाहणी केली. तसेच, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक ते निर्देश दिले.
हिंदमाता आणि गांधी मार्केट उदंचन केंद्राचे परिचलन अधिक परिणामकारक व्हावे, यासाठी दक्ष रहावे. याठिकाणी "फ्लो मीटर" बसवावेत. सर्व पंपांची क्षमता एकसमान करावी. अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे, डिझेल जनरेटर पंप तैनात ठेवावेत. चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचू नये आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये, याची दक्षता बाळगावी, असे निर्देश श्री. गगराणी यांनी दिले.
रस्ते काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाल्यावर तात्काळ रस्तारोधक (बॅरिकेडस्) काढले आहेत का.. उर्वरित बांधकाम साहित्य तसेच राडारोड्याची विनाविलंब विल्हेवाट लावली आहे का.. पदपथ सुस्थितीत आहेत का.. याची पाहणी करावी असे निर्देश देखील श्री. गगराणी यांनी दिले.
यावेळी श्री. गगराणी यांनी एफ दक्षिण विभाग कार्यालय परिसरातील नागरी सुविधा केंद्रास भेट दिली. तसेच , प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त यांनी नियमितपणे नागरी सुविधा केंद्रास भेट देऊन कामकाजाचा आढावा घ्यावा, अशी सूचना देखील श्री. गगराणी यांनी केली.
उप आयुक्त श्री. देविदास क्षीरसागर (परिमंडळ 5), एल विभागाचे सहायक आयुक्त श्री. धनाजी हेर्लेकर, एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त श्री. महेश पाटील, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. अरुण क्षीरसागर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर