Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
एसटी कर्मचाऱ्यांन साठी महत्त्वाची बातमी..
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांनी केली राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनावर जून 2025 पासून 46 टक्के ऐवजी 53 टक्के महागाई भत्ता देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा..
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यांपैकी एक पर्याय निवडता येईल : एकनाथ शिंदे.
मुंबई : संदिप शांताराम शिंदे
राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनावर जून 2025 पासून 46 टक्के ऐवजी 53 टक्के महागाई भत्ता देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा आज शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी केली. उपमुख्यमंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यांपैकी एक पर्याय निवडता येईल असेही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
एसटी कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघात विमा कवच, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी 12 महिन्यासाठी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बससेवेच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळायला हवी, बसगाड्या आणि बसस्थानके स्वच्छ असली पाहिजेत. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर द्यायला हवा, राज्यातील बसस्थानके ही "बस पोर्ट" झाली पाहिजेत असे सांगताना एसटी तोट्यातून वर कशी काढता येईल याचा अभ्यास करावा, आणि एसटीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही उपमुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आणि शिवपरिवहन कामगार सेनेचे आनंदराव अडसुळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #PratapSarnaik #Maharashtra
रिपोर्टर