Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या नालेसफाई कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
नालेसफाईची सर्व कामे दिनांक 7 जून 2025 पर्यंत पूर्ण करावीत. नाल्यातून काढलेल्या गाळाची 48 तासात क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.
मुंबई : संदिप शिंदे.
उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या नालेसफाई कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, विक्रोळी येथील सूर्या नगर या दरड प्रवण क्षेत्र आणि दादर येथील महानगरपालिकेच्या सफाई कामगारांची वसाहत असलेल्या कासारवाडीला भेट दिली.
प्रारंभी श्री. शिंदे यांनी भांडुप येथील उषा नगर नाला, उषानगर संकुल, वडाळा येथील नेहरूनगर नाला, धारावी टी जंक्शन जवळील नालेसफाई कामांची पाहणी केली.
नालेसफाईची सर्व कामे दिनांक 7 जून 2025 पर्यंत पूर्ण करावीत. नाल्यातून काढलेल्या गाळाची 48 तासात क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले. नालेसफाई कामांवर देखरेख राहावी, त्यात अधिक पारदर्शकता यावी यासाठी महानगरपालिका प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, ही कौतुकाची बाब असल्याचे देखील श्री. एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
विक्रोळी येथील सूर्या नगर या दरड प्रवण क्षेत्रठिकाणी दरवर्षी दुर्घटना घडत असल्याने स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. संरक्षक जाळी बसवावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केली.
दादर येथील महानगरपालिकेच्या सफाई कामगारांची वसाहत असलेल्या कासारवाडीला भेट देऊन श्री. शिंदे यांनी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, अभ्यासिका आणि तिथे केलेल्या इतर कामांचाही त्यांनी आढावा घेतला.
माजी आमदार तथा श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री. सदा सरवणकर, आमदार श्री. तुकाराम काते, माजी खासदार श्री. राहुल शेवाळे, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री. नवीन सोना, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, उप आयुक्त (परिमंडळ ५) श्री. देविदास क्षीरसागर, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, उप आयुक्त (परिमंडळ 6) श्री. संतोष धोंडे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्री. श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
रिपोर्टर