Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
थोडक्यात महत्त्वाची बातमी..
" युसुफ अन्सारी तडीपार"
मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्यासाठी, "भोंगा मुक्त मुंबई" अभियानाचा पाठपुरावा करण्यासाठी, हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीचे सचिव युसुफ अन्सारी यांनी एप्रिल महिन्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
"मशिदींवरील भोंगे बंद करणार नाही" व किरीट सोमय्या यांना घरी येऊन मारण्याची भाषा करणाऱ्या अन्सारी यांना पोलिस उपायुक्त (DCP Zone 6) यांनी हद्दपार आदेश क्र. 170/सी/43, 16 मे 2025 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अन्वये 15 महिन्याकरिता युसुफ अन्सारीला मुंबईतून हद्दपार "तडीपार" केले आहे.
महाराष्ट्रातील वरिष्ठ भाजपा नेते यांनी किरीट सोमय्या यांना धमकी देणाऱ्या युसुफ अन्सारी विरोधात मुंबई पोलीस आयुक्त तथा महाराष्ट्र पोलीस आयुक्त यांना लेखी निवेदन दिले होते त्याची दखल घेत युसुफ अन्सारी यांच्या वर पोलिसांनी तडीपार चे आदेश देण्यात आले असे समजण्यात येते.
रिपोर्टर