Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
थोडक्यात महत्त्वाची बातमी..
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, विविध सोयीसुविधांच्या पूर्वतयारींचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित समन्वय बैठकीत घेतला आढावा.
मुंबई : प्रतिनिधी.
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, देवनार पशुवधगृह येथे पुरविल्या जाणाऱ्या विविध सोयीसुविधांच्या पूर्वतयारींचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित समन्वय बैठकीत आज आढावा घेतला.
बकरी ईद सणानिमित्त धार्मिक पशुवधाच्या परवानगीकरीता अर्ज करण्यासाठी MyBMC ॲप्लिकेशन तसेच धार्मिक पशुवधासाठी आयात परवाना व "स्लॉट बुकिंग" साठी https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे.
बकरी ईद सणाच्या कालावधीत देवनार पशुवधगृह येथे सुविधा देताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, नागरिकांना वाहनतळ उपलब्ध करुन द्यावे; वाहनतळासह संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवावी; नागरिकांना सुस्पष्टपणे दिसतील, अशाप्रकारचे सूचना फलक जागोजागी लावावेत, परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी विशेष पथक नेमावे इत्यादी निर्देशही डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त (विशेष) श्रीमती चंदा जाधव, पोलिस उपायुक्त ( वाहतूक-3 ) श्री. प्रदीप चव्हाण, सहायक आयुक्त ( मालमत्ता ) श्री. पृथ्वीराज चौहाण, सहायक आयुक्त ( एम पूर्व ) श्री. उज्ज्वल इंगोले, सहायक पोलिस आयुक्त ( देवनार विभाग ) श्री. राजेश बाबशेट्टी, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते
रिपोर्टर