Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
थोडक्यात माहिती..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे लोकार्पण आज मोठ्या आनंदात आणि उत्साहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे लोकार्पण आज मोठ्या आनंदात आणि उत्साहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा त्याच तेजाने, त्याच सन्मानाने आणि आधीपेक्षा जास्त भव्यतेने उभा केलेला आहे. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जेव्हा दुर्दैवी घटना घडली होती, तेव्हाच महायुती सरकारने हा पुतळा पुन्हा एकदा त्याच ठिकाणी विक्रमी वेळेत उभारण्याचा निर्धार केला होता. आज आम्ही सर्वांनी मिळून त्या पुतळ्याचे पूजन केले. हे काम विक्रमी वेळेत केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, अधिकारी यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याहस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झालेले होते. आज ते या सोहळ्याला उपस्थित नसले तरीही सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ते सध्या शिवकार्यच करत असल्याचे मत याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.
कोकणातील भौगोलिक परिस्थिती पाहता कितीही वेगाने वारे वाहिले, अगदी तोक्ते सारखे वादळ जरी आले तरीही या पुतळ्याला काही होणार नाही या पद्धतीने त्याची रचना करण्यात आली असून आयआयटीतील तज्ञ, जे.जे.स्कुल ऑफ आर्टसचे प्रमुख यांनी अतिशय सुंदर डिझाइन तयार करून त्यानुसार मूर्तिकार राम सुतार यांनी हे काम पूर्ण केले आहे. 91 फुट उंच असलेला हा पुतळा कदाचित देशातील सर्वात उंच शिवाजी महाराजांचा पुतळा ठरेल. या पुतळ्याच्या आजूबाजूची जागाही ताब्यात घेऊन या परिसराचा सुनियोजित असा विकास केला जाईल असेही यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक तसेच महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर