Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई येथे मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला विविध लोकसभा मतदारसंघातील खासदार नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड आणि मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री. धर्मवीर मीना, डीआरएम हरिश मीडा तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
येणाऱ्या काळात ठाणे, नवी मुंबई आणि मध्य रेल्वेच्या इतर भागातील नागरिकांना अधिक सुसज्ज आणि सुविधासंपन्न रेल्वे सेवा मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
मुंबई : विशेष प्रतिनिधी.
ठाणे रेल्वे स्थानकासंदर्भात विविध महत्त्वाचे प्रश्न यावेळी मांडण्यात आले. प्रवाशांची वाढती संख्या, सुविधा व विकासकामे या सर्व बाबींचा उल्लेख करत एक ठोस निवेदन रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आलं. त्यावर तत्काळ कृती करण्याच्या दृष्टीने पुढील टप्प्यात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर रेल्वे संबंधित कोणताही निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणं आवश्यक असल्याचं बैठकीत स्पष्टपणे सांगण्यात आलं. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघातील मुख्य रेल्वे स्थानकासाठी एक "निर्णायक अधिकारी" नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
नवी मुंबईतील काही रेल्वे स्थानकांबाबतही चर्चा करण्यात आली. सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील असमन्वयामुळे काही प्रकल्प रखडले आहेत. तरी लवकरच सिडको व रेल्वे यांच्यात समन्वय वाढवून समस्यावर उपाययोजन करण्याचा निर्णय उपस्थित सर्वांनी एकमताने घेतला.
उपस्थित खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील मुद्दे मांडून प्रवाशांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहचवल्या. रेल्वे अधिकाऱ्यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद देत शक्य त्या सर्व उपाययोजना त्वरित करण्याचं आश्वासन दिलं. आता येणाऱ्या काळात ठाणे, नवी मुंबई आणि मध्य रेल्वेच्या इतर भागातील नागरिकांना अधिक सुसज्ज आणि सुविधासंपन्न रेल्वे सेवा मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, खासदार वर्षा गायकवाड, खासदार धैर्यशील पाटील, खासदार श्रीरंग बारणे, खासदार चंद्रकांत हंडुरे, खासदार रामभाऊ वाझे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
Varsha Gaikwad Dhairyashil Patil Shrirang Appa Barne Chandrakant Handore Shivsena - शिवसेना
#nareshmhaske #CentralRailway #ThaneStationDevelopment #RailwayMeeting #PassengerFacilities #RailwayUpgrades #MPInitiative #CollaborativeGovernance #UrbanTransport #RailwayImprovements #MumbaiRailNetwork #PublicWelfare
रिपोर्टर