Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सोलापूर : वृत्तप्रतीनिधी
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
सांगोला शहरात भव्य मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त हे वर्ष एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून संपूर्ण राज्यभरात आरोग्य शिबीरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे घेण्यात येत आहेत. आज झालेल्या शिबिरात 10 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी होत आपली आरोग्य तपासणी केली. सदरील शिबिरात आलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी आवश्यक ती मदत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करणार आहे असे उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिबिरात डोळ्यांची तपासणी केल्यानंतर रुग्णांना मोफत चष्मे देखील देण्यात आले. मोफत इसीजी, बीपी, शुगर, महिलांसाठी मोफत सर्व तपासण्या करण्यात आल्या. आलेल्या सर्व रुग्णांना उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
सांगोला येथील शिबिरात जवळ जवळ 60 हॉस्पिटल चे डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते. तपासणी झालेल्या रुग्णांना मोफत गोळ्या आणि औषध देखील देण्यात आले.
राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शिबिरात येताच उपस्थित सर्व नागरिकांशी संवाद साधला. शिंदे साहेब बोलताना म्हणाले की, 'राज्यातील जनतेच्या आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली होती. या कक्षाच्या माध्यमातून आजवर अनेक आरोग्य शिबिरे, अपंगांना मोफत कृत्रिम हात, पाय बसवणे, हृदयाला छिद्र असलेल्या 5 हजारांहून अधिक बालकांची विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा माध्यमातून गेल्या अडीच वर्षात विविध आजारांसाठी 450 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने सांगोला विधानसभा मतदारसंघात एक रुग्णवाहिका देण्यात आली असून राज्यात जिथे जिथे गरज असेल तिथे शिवसेनेच्या वतीने रुग्णवाहिका देण्यात येईल असे याप्रसंगी स्पष्ट केले. तसेच लवकरच सांगोला येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची शाखा सुरू करण्यात येईल असेही यासमयी शिंदे साहेबांनी जाहीर केले.
सदर कार्यक्रमास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार शहाजीबापू पाटील, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाप्रमुख चरणराज चावरे, महेश चिवटे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि शिबिरात सहभागी झालेले स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर