Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
उद्धव ठाकरे राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी नवी मोहीम "बंधू मिलन"
मुंबई : वृत्तसंस्था.
विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले पण मनसे आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या दोन्ही पक्षांना अपयश आले. राजकीय वर्तुळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार अश्या चर्चेला उधाण आले आहे.
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे" अश्या आशयाचे बॅनर्स शिवसेना भवनासमोर लावण्यात आले आहेत. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे. मराठी सेनेचे मोहनिश राऊळ यांनी "बंधू मिलन" या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या नवीन मोहिमेची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुढी पाडव्याच्या दिवशी मोहनिश राऊळ यांनी "बंधू मिलन" या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मुतिस्थळावर ठेवली आहे. या कार्यक्रमाचे आयोजनही स्मुतीस्थळावरच करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला येण्यासाठी दोन्ही ठाकरेंना विनंती केली जाणार आहे. यामुळे आता या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यात काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई महानगर पालिकाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची मागणी समाजमध्यामावर होत आहे.
रिपोर्टर