Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मराठीच्या अनेक विषयासंबंधीत मराठी एकीकरण समितीने घेतली परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट.
मराठीच्या अनेक विषयासंबंधीत मराठी एकीकरण समितीने घेतली परिवहनमंत्री यांची भेट.
काल दिनांक ०८/०३/२०२५ रोजी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा.ना.प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन राज्यातील परिवहन विभागा संबधीत असणाऱ्या मराठी भाषा व मराठी माणसाच्या हक्काच्या असणाऱ्या व सुरक्षा दृष्टीने काही म्हहत्वाच्या विषयावर लेखी मागण्या केल्या,त्या विषयासंबधी निवेदन माननीय मंत्री महोदयांना दिले आहे.
१. महाराष्ट्र राज्यात नोंदणी असलेल्या सर्व व्यावसायिक (कमर्शिअल) वाहनांवरील हिंदी सामाजिक संदेश काढून मराठीत असावेत यासाठी पासिंग/फिटनेससाठी बंधनकारक अट लागू करण्याबाबत निवेदन
२. महाराष्ट्र परिवहन विभाग व राज्यातील इतर परिवहन ठेकेदारी पद्धतीने भरणाऱ्या चालक , वाहक व इतर नोकऱ्यांमध्ये १००% स्थानिक मराठी उमेदवारांना प्राधान्य देणेबाबत निवेदन
३. महाराष्ट्रातील प्रवासी वाहनांचे (रिक्षा/टॅक्सी/बस) चालक व वाहक बॅज /परवाना मिळविण्यासाठी मराठी भाषा अवगत असणे बंधनकारक करण्याबाबत निवेदन
४. महिला सुरक्षेसाठी MMR (मुंबई, ठाणे व इतर शहर) रिक्षा टॅक्सी चालकांसाठी पोलीस व्हेरिफिकेश (चारित्र्य पडताळणी) सक्तीचे करणे आणि परराज्यातील चालक परवाना (लायसेन्स) असणाऱ्या नागरिकांना महाराष्ट्रात अंतर्गत स्थानिक रिक्षा/टॅक्सी बॅज मिळणेसाठी स्थानिक रहिवास असणे अट बंधनकारक करणेबाबत निवेदन.
५. मिरा भाईंदर शहरातील वादाचे, बहुचर्चित असे शासकीय भूखंडावर आमच्या कररूपी निधीचा गैरवापर करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे हिंदी भाषिक/ उत्तर भारतीय भवन रद्द करून त्या वास्तूला शहर सांस्कृतिक भवन असे सर्वसमावेशक नाव देणेबाबत निवेदन
याप्रसंगी माननीय महोदय यांनी सदर विषय प्रशासनाला सूचना देऊन लवकरात लवकर करून घेऊ असे आश्वासन मराठी एकीकरण समिती ला दिले आहे.
महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा आणि मराठी अस्तित्त्व जपण्याचे कार्य शासन स्थरावर व्हावे, प्रशासनाने उदासीन राहू नये आणि यासाठी शासन व प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे अशी भूमिका अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मांडली..
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोवर्धन देशमुख, कार्यध्यक्ष प्रदीप सामंत, सचिव कृष्णा जाधव, उपाध्यक्ष रवींद्र भोसले, प्रमोद पार्टे, महेश पवार शहर अध्यक्ष सचिन घरत आणि मराठी शिलेदार नरेंद्र कदम, अजित म्हापदी, दीपेश सरोदे, नितेश सावर्डेकर व इतर उपस्थित होते.
https://youtu.be/o_51ZTOHJOc?feature=shared
रिपोर्टर