Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्चला मिळणार : मंत्री अदिती तटकरे.
मुंबई : वृत्तप्रतीनिधी.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यभरातील लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे. या लाभार्थी बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला होता. दरम्यान राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की येत्या 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून विधिमंडळाचे विशेष सत्र होणार असून खास महिला लोप्रतिनिधींसाठी व राज्यातील महिलांसाठी हे सत्र असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने बाबत महत्त्वाची माहिती जनतेला देण्यात येणार असून योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या 8 मार्च रोजी वितरित केला जाणार आहे.
दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधत राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करून महिला दिन साजरा करणार आहेत. दरम्यान राज्यात पात्र लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
रिपोर्टर