Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
उबाठा गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. ठाण्यातील आनंद आश्रमात हा पक्षप्रवेशाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कोकणातला हा ढाण्या वाघ पुन्हा खऱ्या सेनेच्या गुहेमध्ये दाखल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
ठाणे : वृत्तसंस्था
उबाठा गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. ठाण्यातील आनंद आश्रमात हा पक्षप्रवेशाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कोकणातला हा ढाण्या वाघ पुन्हा खऱ्या सेनेच्या गुहेमध्ये दाखल झाल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करून त्यांचे शिवसेनेत जाहीर स्वागत केले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हिंदुत्वाचा वारसा शिवसेनेच्या माध्यमातून पुढे नेत असताना राज्यभरातून नागरिकांचा भक्कम पाठींबा शिवसेनेला लाभतो आहे. त्यामुळेच विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते संघटनेशी जोडले जात आहेत. याच शिवसेना परिवारात आज नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, उपनेते, आमदार अशी विविध पदं भूषवलेले राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी प्रवेश घेत आहेत याचा मला विशेष आनंद होत असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने कोकणात शिवसेना अधिक भक्कम झाली आहे. यापुढे देखील याच पद्धतीने मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतील असा विश्वास यावेळी बोलताना शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी साळवी यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, संगमेश्वरचे संपर्कप्रमुख राजेश शेलार, रत्नागिरी जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत मणचेकर, राजापूर पंचायत समिती सभापती सुभाष गुरव, लीला धडशी, विभागप्रमुख शरद चरकरी, युवासेनेचे उपतालुकाप्रमुख सुभाष सुर्वे तसेच राजापूर, लांजा, साखरपा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी राज्याचे मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह राजापूर, लांजा, साखरपा येथील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर