Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतियाची दादागिरी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत मराठी पोलीस कुटुंबाला बेदम मारहाण..
परप्रांतीयाच्या कडून आर्थिक फायदा घेवून परप्रांतियांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांनाच परप्रांतीयांनी मारहाण केली. पोलिसांच्या हप्तागिरी मुळे खुद्द पोलीसच सुरक्षित नाही तिथे सामान्य मराठी जनतेची सुरक्षा कोण करणार..
कल्याण : वृत्तसंस्था.
महाराष्ट्र राज्यात वाढलेले परप्रांतीय लोंढे आज महाराष्ट्रातील स्थानिक मराठी जनतेला मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याचे चित्र आहे त्यानं राजकीय पक्षांनी आपल्या वोट बँक साठी परप्रांतियांना पाठीशी घालत आहेत. मराठी लोकांना घरे नाकारणे, नोकऱ्या नाकारणे एवढेच काय तर मराठी राज्यात हिंदी आणि परप्रांतीय भाषा सक्तीने लादण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. कल्याण मधील मराठी कुटुंबाला गुंड आणून प्राणघातक हल्ला करणाऱ्या शुक्ला प्रकरण गाजत असताना कल्याण मध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थाचे धिंडवडे निघाले आहेत परप्रांतीयांचे आणखीन एक प्रकरण घडले.
कल्याण मध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरीची घटना समोर आली आहे. परप्रांतीय व्यक्तीने एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. उत्तम पांडे (वय 40) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पांडे याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला पांडे व त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.
पोलिसांन कडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील आडीवली ढोकळी परिसरात एका अल्पवयीन मुलीशी उत्तम पांडे याने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना पांडे याने तिला घरात ओढून तिच्यासोबत गैरवर्तन केले. मुलीने सदर घटना आपल्या वडिलांना सांगितली.
वडिलांनी पांडे याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी पांडे याने तिच्या वडिलांशी वाद घालण्यास सुरुवात करत मारहाण केली. पीडित मुलीच्या आजीने मुलीच्या आईला हे सांगताच ती देखील घरी आली. तिला सगळा प्रकार समजताच तिने जाब विचारताच पांडे याची पत्नी रिना हिने मुलीची आई व आजीला मारहाण केली.
याघटनेत पीडित मुलीचे वडील, आई व आजी जखमी झाले आहेत. मुलीचे वडील हे मुंबई पोलिस दलात कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात उत्तम पांडे व त्याची पत्नी रिना पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघाना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था धाबे दणाणले आहे मराठी लोकांमध्ये राजकीय पक्षांच्या नेते आणि पोलीस प्रशासन यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला असून परप्रांतीयांवर सरकार काय कारवाही करते हे येत्या काळात समजेल...
रिपोर्टर