Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांचे निलंबन.
ठाणे : निलेश राणे.
महाराष्ट्र राज्य हादरणाऱ्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.
गुन्हा दाखल करण्यास विलंब आणि तपासातील विलंबा बद्दल त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असे सूत्रांकडून समजते. खातेनिहाय चौकशीनंतर त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वकील हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयात दिली.
बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास 12 तास लावल्याचा आरोप पीडित चिमुकलीच्या आईने केला आहे.
रिपोर्टर