Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री पुनश्च एकनाथ शिंदे व्हावे हा जनमताचा कौल..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी नावाची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : संदिप शां. शिंदे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन करणार आहे. मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत असल्याने मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विधानसभा निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील लढवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे करून महायुती सरकारने राज्यात विकासकामांचा धडाका लावला होता. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेने राज्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले महिलावर्ग एकनाथ शिंदे यांच्या वर विश्वासाने मतदानाला उतरल्या त्यातच शैक्षणीक योजना, शेतकऱ्यांसाठी योजना, राज्यातील विकासासाठी योजना, वैद्यकीय मदत, आरक्षण सारखे विषय एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थित हाताळले. सर्वसामान्यांचा संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना नागरिकांनी गौरविले, त्यात भाजपा नेत्यांनी महाराष्ट्राचे विकासशील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती देत मुख्यमंत्री चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला आणि याचा फायदा महायुती सरकार ला झाला. महाराष्ट्रातील जनतेने भरघोस मतदान केल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 288 पैकी 236 जागांवर विजय मिळावला.
तर दुसरीकडे मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेत्यांनी आणि आर एस एस नेत्यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नावाची चर्चा सुरू केली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा देखील सध्या जोराने सुरु आहे. तर भाजप स्वतःकडे मुख्यमंत्री पदासह 21 मंत्रीपदे तसेच गृह, वित्त, नगरविकास आणि महसूल ही महत्त्वाची चार पदे भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी नावाची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या पश्र्च्यात मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 288 पैकी 236 जागांवर विजय मिळावला आहे. यामध्ये भाजपला 131 तर शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागांवर विजय मिळाला. यामध्ये काँग्रेसला 16, ठाकरे यांच्या शिवसेनेला 20 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागांवर विजय मिळाला आहे तर 2 जागांवर समाजवादी पक्षाला यश आले आहे.
रिपोर्टर