Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP) यांच्या पक्षाच्या भायखळा तालुकाध्यक्षावर हल्ला करण्यात आला आहे. हल्यात भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला.
वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे भायखळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई : वृत्तसंस्था.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP) यांच्या पक्षाच्या भायखळा तालुकाध्यक्षावर हल्ला करण्यात आला आहे. यात तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला. नवरात्री उत्सवाच्या काळात भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर शुक्रवारी धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी अज्ञाताने रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर रात्री अज्ञातानी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तालुकाध्यक्ष कूर्मी यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सचिन कुर्मी भायखळा तालुकाध्यक्ष आहेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सचिन कुर्मी हे जखमी अवस्थेमध्ये पडले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या गाडीतून उपचारांसाठी जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केलं.
सचिन कुर्मी यांच्यावर कोणी आणि कोणत्या कारणासाठी हल्ला केला हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शिवाय, या हत्येमुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आरोपींना तात्काळ पकडण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अद्याप याप्रकरणी कोणतीही अटक झालेली नाही. तर कुर्मी हे समीर भुजबळ यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे, एनसीपी नेते तथा मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी कुर्मी कुंटूबांची भेट घेवून स्थानिक पोलिसांनाकडे तत्काळ आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे. तर पुढील तपास सुरू असून याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रिपोर्टर