Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
दिल्लीच्या शाही ईदगाह पार्कमध्ये उभी राहणार झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ची प्रतिमा.
दिल्ली डेव्हलपमेंट अँथोरिटी च्या जागेवरील वफ्फ बोर्ड मंडळाचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला.
दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीतील शाही ईदगाह पार्क येथे दिल्ली डेव्हलपमेंट अँथोरिटी च्या जागेवरील वफ्फ बोर्ड मंडळाचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे या जागेवर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर बाजार येथील शाही ईदगाह पार्क मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा उभारण्यास बंदी घालण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने म्हंटले याचिकाकर्त्यांनी शाही ईदगाह वफ्फ व्यवस्थापन मंडळाला शाही ईदगाहभोवती उद्यानाच्या देखभालीला विरोध करण्याचा कोणताही कायदेशीर अथवा मूलभूत अधिकार नाही.
शाही ईदगाह वफ्फ व्यवस्थापन समितीलाही दिल्ली महानगर पालिकेच्या आदेशानुसार प्रतिमा बसवण्यात विरोध करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. उच्च न्यायालयाने सदर जागा "वफ्फ" ची संपत्ती असल्याचाही दावा फेटाळून लावला. न्यायालयाच्या आदेशानंतर "डीडीए" आणि दिल्ली महानगर पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन प्रतिमा बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाही ईदगाह सभोवताली बॅरीकेड्स लावण्यात आले असून रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रिपोर्टर