Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "उत्सव मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2023" च्या विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
काही सावत्र भावांना या योजनेची लोकप्रियता सहन होत नाही, त्यामुळे नागपुरातील काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा एकदा कोर्टत गेले आहेत. मात्र काहीही झाले तरीही ही योजना बंद होणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी निक्षून सांगितले.
मुंबई : प्रतिनिधी.
शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "उत्सव मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2023"च्या विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी ठाण्यामध्ये गणेश दर्शन स्पर्धा भरवून अशा स्पर्धांची सुरुवात केली होती. तशीच स्पर्धा आता मुंबईत आयोजित करण्यात आली याचा समाधान आणि आनंद वाटत असल्याचे मत याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अशा स्पर्धांमधून माणूस घडतो, कार्यकर्ता घडत असतो त्यामुळे अशा स्पर्धांची गरज असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच या स्पर्धेला अधिक व्यापक रूप देऊन वेगवेगळ्या जिल्ह्यातील मंडळाचा देखील समावेश करावा अशी अपेक्षा यासमयी शिंदे यांनी व्यक्त केली.
राज्यात महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यातीलच एक योजना असून आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. काही सावत्र भावांना या योजनेची लोकप्रियता सहन होत नाही, त्यामुळे नागपुरातील काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा एकदा कोर्टत गेले आहेत. मात्र काहीही झाले तरीही ही योजना बंद होणार नसल्याचे याप्रसंगी निक्षून सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत दुर्दैवी घटना घडली. मात्र त्याच राजकारण करण्यासाठी काही जण आज रस्त्यावर चालले. यानिमित्ताने ते घराबाहेर तरी निघाले याचा मला आनंद आहे. मात्र असेच ते इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवेळी का नाही चालले, महापूर आला तेव्हा का नाही रस्त्यावर उतरले, कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी का नाही रस्त्यावर उतरले असे प्रश्न आज लोकं विचारत आहेत असे मत यासमयी शिंदे यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेत विजेते ठरलेल्या सर्व मंडळांना सन्मानित केले. तसेच वक्तृत्व स्पर्धा गाजवणाऱ्या तेजस्विनी केंद्रे या मुलीचे विशेष कौतुक केले.
सदर कार्यक्रमास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल, शिवसेना सचिव सुशांत शेलार, संजय मोरे तसेच शिवसेना, महिला आघाडी, युवासेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर