Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
कल्याण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांच्या आढावा बाबत तसेच कल्याण महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या 27 गावांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजना राबविण्यात येत आहे : डॉ. श्रीकांत शिंदे. शिवसेना खासदार.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका स्थानिक पातळीवर शहराच्या सर्वांगीण विकास या महत्वाच्या विषयांसह बैठकीत अनेक महत्वाच्या प्रकल्पांबाबत सविस्तररित्या चर्चा करण्यात आली.
कल्याण : संदिप शां. शिंदे.
कल्याण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांच्या आढावा बाबत तसेच कल्याण महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या २७ गावांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या कामांच्या बाबतीत आज कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक घेतली.
या बैठकीत खालील महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली : -
- 27 गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत योजेनेचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम देखील तातडीने पूर्णत्वास नेण्यात येत आहे. येत्या मार्च 2025 मध्ये उर्वरित काम पूर्णत्वास जाणार असून नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
- 27 गावांमधील प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांनी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत नियमित स्वरूपात समन्वय साधावा जेणेकरून कामाला गती देखील येईल आणि काम जलदगतीने पूणर्त्वास जाईल अशा सूचना यावेळी दिल्या. तसेच या गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या जलकुंभांच्या कामाचा आढावा घेऊन काम जलदगतीने करण्याच्या सूचना केल्या.
- महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाळांचे सुशोभीकरण आणि अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. त्याबाबत महापालिकेकडून डीपीआर तयार करण्यात आला असून त्यानुसार काम सुरु करण्यात येणार आहे.
- शहरातील स्मशानभूमींचे देखील अद्ययावतीकरण करण्यात येणार असून यासाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. याचे कामही जलदगतीने करण्यात येणार आहे.
- कल्याण पूर्व येथे भव्य असे स्टेडियम उभारण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या जागेपैकी 60 टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित काम देखील सुरु असून विविध सुविधांनी युक्त असे हे स्टेडियम असणार आहे. याच बरोबर खंबाळपाडा, बारवे येथे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा घेतला.
- शहरातील सर्व उद्यानांचे, तलावांचे सुशोभीकरण, नूतनीकरण करण्यात येणार असून त्याबाबतचा डीपीआर महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. याबाबत देखील काम सुरु होणार आहे.
- शहरातील वाहतुक नियमन आणि पार्किंग नियमन करण्यासाठी तसेच स्मार्ट टॉयलेट उभारणीसाठी केपीएमजी या नामांकित संस्थेची निवड करण्यात आली असून क्रॉस सबसिडी मॉडेल ( महापालिकेला पैसे खर्च न करता ) अंतर्गत ही सर्व विकासकामे करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.
- सावळाराम क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करणे गरजेचे असून यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून खेळाडूंना अनेक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
- कल्याण रिंग रोडचे काम देखिल अंतिम टप्प्यात आले आहे. येथील बाधितांना बीएसयूपीची घरे देण्यात येणार आहेत. मात्र तत्पूर्वी बीएसयूपीच्या घरांची स्थिती चांगली करावी अशा सूचना पालिका प्रशासनाला दिल्या.
- कल्याण पश्चिमेसाठी मंजूर झालेल्या मेट्रो - 5 च्या आधीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पूर्वी ही मेट्रो दुर्गाडी - सहजानंद चौकातून जाणार होती. मात्र आता नव्या मागणीनुसार दुर्गाडी - खडकपाडा मार्गाला मंजुरी देण्यात आली असून त्याचा डीपीआरचे कामही आता पूर्ण झाले आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल. त्यामुळे पूर्ण कल्याण पश्चिम मेट्रो मार्गाने जोडले जाईल. याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
- मेट्रो - 12 चे भूसंपादनाचे काम आणि उभारणीचे काम जलदगतीने पूर्णत्वास जावे यासाठी सूचना केल्या.
- एमएमआरडीएच्या माध्यमातून शहरात सुरु असलेल्या रस्त्यांच्या उभारणीबाबत आढावा घेतला.
- एकात्मिक परिवहन प्रकल्प देखील लवकरच सुरु होऊन मतदारसंघातील शहरांतर्गत वाहतूक सुलभ होणार आहे.
या महत्वाच्या विषयांसह बैठकीत अनेक महत्वाच्या प्रकल्पांबाबत सविस्तररित्या चर्चा करण्यात आली. या प्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, अरविंद मोरे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, रवी पाटील, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, शहरप्रमुख महेश पाटील, महेश गायकवाड, मयूर पाटील, सुनील वायले यांच्यासह कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुरानी जाखड यांच्यासह महापालिकेचे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर