Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई युनिट ला मोठे यश भ्रष्ट अधिकाऱ्याला पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यात यशस्वी कारवाईत महानगर पालिका के पूर्व विभागाचा कार्यकारी अधिकारी मंदार अशोक तारी यास अटक.
अनधिकृत बांधकामांचे लोणी खाण्यात पटाईत असलेले मंदार तारी यांच्या अटकेने महानगर पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.
मुंबई : प्रतिनिधी.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई युनिट च्या सापळ्यात महानगर पालिका के पूर्व विभागाचा कार्यकारी अधिकारी मंदार अशोक तारी अडकला. अनधिकृत बांधकामांचे लोणी खाण्यात पटाईत असलेले मंदार तारी यांच्या अटकेने महानगर पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.
मिळालेल्या माहितीनुसार मनपा के पूर्व विभागात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले होते कार्यकारी अधिकारी मंदार तारी याच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत कामाचे भ्रष्ट व्यवहार खुले आम चालू होते, अनधिकृत बांधकाम तक्रारीवर दुर्लक्ष केले जात होते, तक्रारदारांना फसवण्यात मंदार तारी स्वतःला सहाय्यक आयुक्त समजून अतिक्रमण, अनधिकृत कामांना प्राधान्य देत होता अश्याच भ्रष्ट अनधिकृत 2 एक्सट्रा मजल्याच्या परवानगीसाठी कार्यकारी अधिकारी मंदार तारी 2 कोटी मागत होता त्यातल्या पहिल्या इंस्टॉलमेंट ( हप्ता ) साठी दोन दलाल पाठवले होते. पहिला इन्स्टॉलमेन्ट 75 लाखाचा होता. ..
यशस्वी सापळा कारवाई अहवाल :
दि. 06/08/2024
▶️ युनिट - मुंबई
▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 58 वर्ष
▶️ गुन्हा रजिस्टर क्रमांक:- 23/2024 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायदा 1988 कलम 7, 7 अ
▶️ आरोपी लोकसेवक -
1) श्री. मंदार अशोक तारी, निर्देशित अधिकारी, के पूर्व विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, अंधेरी पूर्व, मुंबई
2) मोहम्मद शेहजादा मोहम्मद यासिन शहा, वय 33 वर्ष प्रॉपर्टी इस्टेट एजंट (खाजगी इसम)
3) प्रतिक विजय पिसे, वय 35 वर्ष, कंत्राटदार (खाजगी इसम).
▶️ लाच मागणी रक्कम - रुपये 2,00,00,000/- (रु. दोन करोड)
➡️ लाच पडताळणी दिनांक - 06/08/2023
➡️ स्विकारली लाच रक्कम - 75,00,000/- रुपये
▶️ हकीकत : यातील फिर्यादी यांचे प्लॉट क्रमांक 191 192, शहीद भगतसिंग कॉलनी, जेबी नगर, मुंबई 58 येथे स्वतःच्या मालकीची चार मजली इमारत आहे. नमूद इमारतीचे वरील दोन मजले अवैध असून त्यावर निष्काशन कारवाई न करणे करिता तसेच नियोजित प्लॉट क्रमांक 193, 194 खरेदी केले नंतर तेथील अनधिकृत बांधकामाबाबत सहकार्य करणे असे सर्व मिळून एकूण दोन करोड रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लोकसेवकास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 31 जुलै 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे लेखी तक्रार दिली. त्यानुसार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान लोकसेवक यांनी रुपये दोन करोड इतकी लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून रुपये 75 लाख इतकी लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे तात्काळ करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान उपरोक्त नमूद खाजगी इसम क्र. 2 व 3 यांनी संगनमताने लोकसेवक यांचे सांगणे वरून रोख रुपये 75 लाख इतकी लाचेची रक्कम स्वीकारली असता खाजगी इसम क्रमांक 2 व 3 यांना रंगेहात पकडण्यात आले, म्हणून नमूद आलोसे व खाजगी इसम यांच्याविरोधात ला. प्र. वि., मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाही चे सामाजिक स्तरावर कौतुक होत असून या येत्या काळात महानगर पालिका भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.
रिपोर्टर