Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
शाळेपासून 100 मीटरच्या परिसरामध्ये असलेल्या पान,बिडी, तंबाखू, सिगारेट अशा निषिद्ध वस्तूंच्या विक्री दुकानांवर मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांनी हाती घेतलेल्या Zero Tolerance to Drugs या मोहिमेतून आजची तरुणाई व शाळकरी मुले यांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी शासनाकडून मोठे पाऊल उचलण्यात येत आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून शाळेपासून 100 मीटरच्या परिसरामध्ये असलेल्या पान,बिडी, तंबाखू, सिगारेट अशा निषिद्ध वस्तूंच्या विक्री दुकानांवर मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. तेव्हा पालिकेकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी या विक्रेत्यांनी परिसरातील आपली दुकाने बंद करावी, असे आवाहन मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर यांनी केले आहे.
https://youtu.be/XiBx5JD7Jgc?feature=shared
रिपोर्टर