Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला.
मुंबई : प्रतिनिधी.
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.
योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहिर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विधानभवन समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिला सन्मान योजना ठळक वैशिष्ट्ये :
• फक्त घोषणा नाही, तर लाभार्थी नोंदणीला प्रारंभ झालाय.
• 21 ते 65 वर्ष दरम्यानच्या लाभार्थी महिलांना याचा लाभ होणार आहे.
• पहिल्याच दिवशी अनेक सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयांमध्ये नोंदणीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली.
• नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जारी केली जाणार आहे.
• या योजनेतर्गत लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रूपये मिळणार आहेत.
• दरवर्षी महाराष्ट्र शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार.
• अंमलबजावणी : जुलै 2024 पासून.
• कोण असणार पात्र?
महाराष्ट्र रहिवासी. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. 65 वर्षे पेक्षा कमी वय.
• अपात्र कोण असेल?
2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे. घरात कोणी टॅक्स भरत असेल तर. कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर. कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर. कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून).
• लागणारी कागदपत्रे -
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी अधिवास दाखला , बँक पासबुक , फोटो. योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
• ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा.
रिपोर्टर