Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
सज्ज्य पुन्हा शिवसेना.. महाराष्ट्र राज्य सह मुंबईतील गृहनिर्माण संस्था, संकुल, सोसायटी, सहकार संस्था मधील नागरिकांच्या समस्या, तक्रार, शासकीय यंत्रणेतून होणारी कुचंबणा, दिरंगाई इत्यादी बाबीतून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना बाळासाहेब भवन मुंबई येथे जनता दरबार सुरू.
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव कार्यरत असते : हेमंत खांडेकर.
मुंबई : प्रतिनिधी.
सज्ज्य पुन्हा शिवसेना !
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षनेते, महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणूक 2024 संपूर्ण होताच मुंबईतील सह महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्था, सोसायटी येथील नागरिकांच्या तक्रारी, समस्या, शासकीय यंत्रणेतून होणारी हाल अपेष्टा, दिरंगाई इत्यादी बाबी सोडविण्या करीता जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गृहसंकुलन सदस्य शिवसेना बाळासाहेब भवन मुंबई जनता दरबार सुरू केला असून हौसिंग सोसायटी तज्ञ, शिवसेना गृहसंकुल समन्वयक श्री.हेमंत खांडेकर स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या, तक्रारी समजून घेत त्यावर कायदेशीर मार्ग, न्याय मिळवून देण्यात सहकार्य करीत आहे.
सदर मुंबईतील हौसिंग सोसायटीतील नागरिक मोठ्या प्रमाणात शिवसेना बाळासाहेब भवनात येत असून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे कार्य शिवसेना हौसिंग सोसायटी पदाधिकारी यांच्या हस्ते उत्साहात पार पाडत आहे.
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव कार्यरत असते असे हेमंत खांडेकर यांनी नमूद केले आणि गृहनिर्माण संस्था अंतर्गत होणाऱ्या समस्यांचे निवारण तज्ञ मार्गदर्शनाखाली केले जाईल याची ग्वाही दिली.
रिपोर्टर