Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ.यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी आज माझगाव परिसरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.
देशाला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सौ.यामिनी जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई : प्रतिनिधी.
साद घातली मुंबईकरांना , साथ द्या धनुष्यबाणा! भुलू नका भूलथापांना भगवे हिंदुत्त्व हाच मराठी बाणा!
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ.यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी आज माझगाव परिसरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी देशाला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सौ.यामिनी जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक मतदारांना केले.
या प्रचार यात्रेला जागोजागी स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. ठिकठिकाणी या प्रचारयात्रेवर फुलांची उधळण करून तसेच जागोजागी महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांचे स्वागत करण्यात आले. देशाला महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मेहनत करत असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सौ. यामिनी जाधव यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले.
निवडणुकीचा पाचवा आणि अखेरचा टप्पा असून आपण मतदारांपुढे आपली भूमिका मांडली आहे. यापुढे आता आपल्याला विभागातील मतदारांना घराबाहेर काढून प्रत्यक्ष मतदान करायला लावणे हे आपले कर्तव्य आहे. मुंबईकर नागरिक सुज्ञ असून महायुतीच्या उमेदवार सौ. यामिनी जाधव यांना नक्की भरभरुन मतदान करतील असा विश्वास यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
या भव्य प्रचार फेरीत मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर, खासदार मिलिंद देवरा, मनसे नेते बाळा नांदगावकर, ज्येष्ठ भाजप नेते मधु चव्हाण, बालकल्याण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शहा, महायुतीच्या उमेदवार सौ. यामिनी जाधव, शिवसेनेचे विभागप्रमुख यशवंत जाधव तसेच दक्षिण मुंबईतील महायुतीच्या सर्व प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर