Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
शिवसेना सहकार सेना विभागप्रमुख मा. श्री रवींद्र सिंग यांचे संपर्क कार्यालय तथा उत्तर पश्चिम लोकसभेचे शिवसेनेच्या पहिल्या सहकार सेनेच्या कार्यालय उदघाटन आचारसंहिता नियमाचे उल्लंघन न करता अंधेरी पूर्व मुंबई. येथे सन्मा. संपर्कप्रमुख उदय सावंत, कार्याध्यक्ष आशाताई मिमाडी, यांच्या हस्ते पार पडले.
शिवसेना प्रमुख नेते मा. एकनाथ शिंदे यांच्या विकास कार्याचा ध्यास घेवून अंधेरी पूर्व चाकाला येथे शिवसेना सहकारी सेना उत्तर पश्चिम लोकसभा कार्यालया जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे यातच धन्यता मानतो : रवींद्र सिंग.
अंधेरी : प्रतिनिधी.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच माननीय मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री सहकार सेना अध्यक्ष मा खासदार आनंदराव अडसूळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उपनेत्या सहकार सेना कार्याध्यक्ष सौ. आशाताई मामीडी आणि उत्तर पश्चिम लोकसभा संपर्क प्रमुख श्री उदय सावंत, माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत यांच्या हस्ते पार पडले. शिवसेना सहकार सेना विभागप्रमुख मा. श्री रवींद्र सिंग यांचे संपर्क कार्यालय तथा उत्तर पश्चिम लोकसभेचे शिवसेनेच्या पहिल्या सहकार सेनेचे कार्यालयाचे दिनांक 18/04/2024 रोजी उदघाटन आचारसंहिता नियमाचे उल्लंघन न करता अंधेरी पूर्व, चाकाला मुंबई. येथे कार्यकर्त्यांच्या उत्साहात मोठ्या संख्येत संपन्न झाले.
सदर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने सहकार सेना महिला वर्ग उपस्थित होत्या मा. उदय सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ता रवींद्र सिंग यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत सिंग यांचा गौरव करण्यात आला सदर कार्यक्रमास व्यापारी सेना मुंबई अध्यक्ष हितेश अजानी, मुंबई सचिव संदिप शिंदे, उपविभाग प्रमुख वॉर्ड क्र 2 रोहन राणे, सहकार उपविभाग प्रमुख वॉर्ड क्र 5 सचिन जोईल, लोकसभा संघटिका सौ. दिव्य खडताले, विलेपार्ले विधानसभा महिला प्रमुख सौ. सुनंदा कदम, संघटक सौ. वृंदा मोघे, 86 वॉर्ड शाखा प्रमुख सौ. धनलक्ष्मी पटेल मोठ्या संख्येने सहकार सेना पदाधिकारी महिला वर्ग शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रवींद्र सिंग यांना पुढील राजकीय वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.
रिपोर्टर