Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने चंद्रपूर आणि गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची पहिली "विजय संकल्प सभा".
चंद्रपूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने चंद्रपूर आणि गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची पहिली "विजय संकल्प सभा" आज चंद्रपूर येथे पार पडली.
पंतप्रधान मोदीजी यांनी आपल्या भाषणात वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील 370 कलम लावण्याला विरोध केल्याची आठवण करून दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाले चंद्रपूर मधून मिळणारे प्रेम माझ्यासाठी खूप खास आहे कारण चंद्रपूर मधूनच भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी लाकडे पाठविण्यात आली. भारतातील नवीन संसदेच्या इमारती साठीही चंद्रपूर मधील लाकडाचा वापर करण्यात आला, चंद्रपूर ची ख्याती संपूर्ण देशात पोहचली आहे मी चंद्रपुरातील जनतेचे अभिनंदन करतो. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बाळासाहेबांचे विचार तळागाळात पोहचवत असल्याबद्दल एकनाथ शिंदे आणि उपस्थित शिवसैनिक सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी केलेल्या या कौतुकाचा विनम्रपणे स्वीकार करत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमात पंतप्रधान मोदीजी यांना राम मंदिराची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आले. विदर्भाची भूमी प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची ही विराट जनसभा म्हणजे महायुतीच्या विजयाची नांदी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. याठिकाणी लोटलेला प्रचंड जनसागर पाहता आज गुढीपाडवा साजरा करतोय असे वाटत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गेली 10 वर्षे केलेल्या सुशासन पाहता ते पुन्हा एकदा विजयी गुढी उभारतील आणि पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक नक्की साधतील असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार किशोर जोरगेवार, महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर