Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
बोरिवली पश्चिम मुंबई जनतेच्या ट्रॅक्स रुपी पैश्याने बांधलेल्या स्कायवॉक ब्रीज नागरिकांच्या सुविधा साठी की परप्रांतीयांचे धंदे पोसण्यासाठी.
हा आहे बोरीवली पश्चिम स्थानकाबाहेरचा स्कायवॉक. अगदी बोरिवली पोलीस ठाणे समोर आणि मनपा आर मध्य वॉर्ड च्या बाजूला लोक याचा अजिबात वापर करीत नाही. कोणताही मागचा पुढचा विचार न करता करोडो रुपये खर्च करून असे अनेक स्कायवॉक मुंबईमध्ये बांधण्यात आले आणि आता ते ओस पडलेले आहेत. लोकांनी मेहनत करून कमावलेला पैसा टॅक्स रुपी टक्केवारीच्या नादाने लोकांच्या सूचना न मागविता वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरला जातो.
लोकप्रतिनिधी लोकांसाठी आहेत की स्वतःचं घर चालविण्यासाठी?
ना लोकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे, ना गाड्या चालवण्यासाठी रस्ते मोठे. रस्ते पदपथ स्कायवॉक रेल्वेच्या दोन्ही बाजूला जाण्या येण्यासाठी बांधलेले पूल प्रत्येक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले आहे...
हे आहे मुंबई ठाणे सारख्या शहरांचे रडगाणे. मी आणि माझे घर आणि माझा नेता... समाज खड्ड्यात. हे सर्व विभागीय पदाधिकाऱ्यांना दिसत नाही का? का, ते संबंधित शासकीय, मनपा अधिकाऱ्यान विरोधात आवाज का नाही उठवत..?
दुसरीकडे मराठी लोकही जागृत नाहीत. ना संघटित... त्यामुळे महाराष्ट्र राज्य उकिरडा झाला असून कोणीही येतो कुठेही काही करतोय याची कोणालाही पोच पावती नाही. अगदी पोलिसांनाही नाही.
https://youtube.com/shorts/ive-W5lPTK4?feature=shared
रिपोर्टर