Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत गुरूवारी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील उबाठा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
महायुती सरकारच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन विविध पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
उल्हानगर : प्रतिनिधी.
मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात अनेक जनहिताची कामे मार्गी लागली आहेत. महायुती सरकारच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या या विकासकामांनी प्रभावित होऊन विविध पक्षातील नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांच्या मुख्य उपस्थितीत गुरूवारी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील उबाठा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये उबाठा गटातील महिला शहर संघटक मालती पवार, माजी नगरसेविका मंगल घोणे, उपशहर संघटक ज्योती राणे, उपशहर संघटक संगीता उतेकर, नौमी बॅस्टन, रेवती वोरियर, विभागप्रमुख सुनयना गावडे, विभागप्रमुख अनिल कुंचे, उपशहर संघटक प्रकाश भंडारी, विभाग संघटक राजू चिकने, महिला आघाडी उपशहर संघटक रेखा गायकवाड, उपविभाग प्रमुख मनिषा कर्वे, मालु कुंडेकर, शाखाप्रमुख छाया राजाराम देसाई, उपशाखाप्रमुख शुभधा तावडे, सुरेखा सरपरे, माधुरी घोणे, सविता गावडे, रुख्मिणी धडाम, वनिता कुंडेकर, आशा शिंदे, शोभा गोळे आणि अमेय घोणे तसेच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत केले आणि त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी, शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी, उपनेत्या कला शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना अंबरनाथ माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, माजी नगरसेवक नाना बागुल, दिलीप गायकवाड, श्रीनिवास वाल्मिकी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#DrShrikantEknathShinde #Shivsena
रिपोर्टर