Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
लोकसभा निवडणुक 2024 च्या पहिल्या टप्प्यात नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार नितीनजी गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे या महायुतीच्या दोन्ही अधिकृत उमेदवारांचे निवडणूक उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भरण्यात आले.
नागपूर शहरातून निघालेल्या भव्य रॅलीमध्ये सहभाग घेतलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिलेल्या "अब की बार, चारसो पार "'आवाज कुणाचा... शिवसेनेचा... अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला.
नागपूर : प्रतिनिधी.
लोकसभा निवडणुक 2024 च्या पहिल्या टप्प्यात आज नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार नितीनजी गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे या महायुतीच्या दोन्ही अधिकृत उमेदवारांचे निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थित महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
नागपूर शहरातून निघालेल्या भव्य रॅलीमध्ये सहभाग घेतला. तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिलेल्या 'अब की बार, चारसो पार', 'आवाज कुणाचा... शिवसेनेचा...' अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला. महायुतीच्या उमेदवारांना मिळत असलेला जनतेचा उदंड प्रतिसाद पाहून लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघातून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचंड बहुमताने विजय होईल, आणि पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधानपदी विराजमान होतील असा विश्वास यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार कृपाल तुमाने, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल तसेच महायुतीतील सर्व पदाधिकारी आणि घटक पक्षांचे सदस्य उपस्थित होते.
रिपोर्टर