Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : संदिप शां. शिंदे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. त्यांच्याच नेतृत्वात भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, याची खात्री असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीसोबत राहून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाच लोकसभा निवडणुकीत रासपला एक जागा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजप आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.
रिपोर्टर