Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारीना मराठी भाषेचा विसर पडला मराठी राज्यात गुजराती भाषेमध्ये पालिकेच्या कंत्राटाची जाहिरात.
मुंबई महानगरपालिकेच्या जाहिराती मराठी व्यतिरिक्त इतर भाषांमध्येही देत असल्यामुळे मुंबई एकीकरण समितीच्या शिल्लेदरानी काही महिन्यांपूर्वी पालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री तानाजी कांबळे यांची भेट घेऊन लेखीवजा तक्रार पत्र दिले होते.
महापालिका जर विविध भाषांमधून जाहिराती देणार असेल तर इतर भाषक मराठी भाषा शिकतील कशाला? असा सवाल केला गेला.
महानगरपालिकेची भाषा मराठी असून फक्त मराठी भाषेतूनच जाहिराती देण्यात याव्यात अशी मागणीही केली होती. त्यावेळी त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्या विषयाचा पाठपुरावा न केल्यामुळे आता पुन्हा गुजराती भाषेमध्ये पालिकेच्या कंत्राटाची जाहिरात आली आहे.
जेव्हा ही जाहिरात निदर्शनास आली, तेव्हा जनसंपर्क कार्यालयात फोन केला. पण दुर्दैवाने तेथील कोणीही फोन उचलला नाही.
त्यामुळे लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा भेटून याबद्दलचा जाब विचारूच आणि वरिष्ठांना त्यांची तक्रारही केली जाणार
https://youtu.be/M8tUDweFk3c?feature=shared
रिपोर्टर