Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
उबाठा गटाचे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवास स्थानी केला शिवसेना पक्षात प्रवेश.
मुंबई : प्रतिनिधी.
उबाठा गटाचे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांनी आज माझ्या वर्षा या निवासस्थानी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ.मनीषा वायकर तसेच असंख्य शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
सच्चे शिवसैनिक, जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार, मुंबई महानगरपालिकेचे चार वेळा स्थायी समिती सभापती असलेले रवींद्र वायकर यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल आनंद होत असल्याचे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
गेल्या अडीच वर्षात राज्यात असलेल्या सरकारने अनेक आमदार, खासदारांची
कामे प्रलंबित ठेवल्याने त्यांना काम करणाऱ्या सरकारमध्ये प्रवेश करावा लागला असल्याचे वायकर यांनी सांगितले. त्यांच्या विभागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील ते नक्की घेतले जातील असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिका, त्यानंतर विधानसभा आणि पक्षाचे काम करण्याचा देखील वायकर यांना प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा शिवसेनेला नक्की उपयोग होईल असे वायकर यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक कमलेश राय, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे संघटक उदय सावंत तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर