Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुंबई महानरपालिकेतील काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा विनोद शेखर, शहाना रिजवान खान, शाबिया इकबाल शेख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
मेघवाल समाजाचे रविकुमार धाडिया व किशोर कुमार यांनीही शिवसेनेत केला जाहीर प्रवेश.
शिवसेना आणि मेघवाल समाजाचे नाते हे जुनेच असून मुंबईसह ठाण्यातही मेघवाल समाज मोठ्या प्रमाणात आहे.
शिवसेनेमध्ये सर्व जाती, धर्माचे लोक आहेत. शिवसेना हा पक्ष सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतो. असे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई : प्रतिनिधी.
मुंबई महानरपालिकेतील काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा विनोद शेखर, शहाना रिजवान खान, शाबिया इकबाल शेख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यांच्यासह मेघवाल समाजाचे रविकुमार धाडिया व किशोर कुमार यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या मुंबईतील माजी नगरसेवकांचा आकडा हा रोजच वाढत आहे. शिवसेना आणि मेघवाल समाजाचे नाते हे जुनेच असून मुंबईसह ठाण्यातही मेघवाल समाज मोठ्या प्रमाणात आहे.
शिवसेनेमध्ये सर्व जाती, धर्माचे लोक आहेत. शिवसेना हा पक्ष सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतो. असे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई मध्ये सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. लोकांचा पैसा वाया जात नाही आहे, रस्ते सुधारत आहे, सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे.
कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेसकोर्सवर 120 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्क उभारण्यात येणार आहे. अर्बन फॉरेस्ट, वृक्षारोपणाच्या माध्यमातून तसेच डीप क्लीन ड्राईव्ह या स्वच्छता अभियानातून प्रदूषण कमी झाले आहे तसेच हवेचा दर्जा सुधारला आहे.
मेघवाल समाजाचा घर भाड्याचा विषय लवकरच पूर्णत्वास नेऊ, तसेच सफाई कामगारांच्या मुलांचा परदेशातील शिक्षणासाठी लागणारा खर्च हा महानगरपालिका करणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना विमा कवच मिळवून देण्यासाठी कामही सुरू असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना पक्षाचे खासदार मिलिंद देवरा शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर