Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मेश्राम फौंडेशनतर्फे नेहरू नगर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी / अधिकाऱ्यांसाठी योग प्रशिक्षण शिबीर संपन्न
पोलिस कर्मचाऱ्यांनी घेतला योग प्रशिक्षणाचा लाभ.
मुंबई : प्रतिनिधी.
मेश्राम फाउंडेशनच्या वतीने दिनांक 24.02.2024 नेहरू नगर पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या मानसिक आणि शाररिक आरोग्यासाठी योग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरास 85 हून अधिक महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी योग शिबिरात सहभाग घेऊन योगाचे फायदे समजून घेतले.
मेश्राम फाउंडेशनचे व्यावसायिक योग प्रशिक्षक - श्री पंकज काळे यांनी योगाचे धडे दिले आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी दररोज योगासन करण्यास प्रवृत्त केले.
सदर शिबिरास पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष साळवी यांनी पुढाकार घेऊन शिबिराचे व्यवस्थापन पाहिले तसेच पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टिकेकर यांनी आवर्जून कर्मचाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी प्रेरित केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री युसूफ सौदागर यांनी पोलीस बांधवाना संबोधित केले व नियमितपणे दैनंदिन जीवनात योग अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले.
मेश्राम फाऊंडेशनचे अनुभवी व कार्यक्षम संचालक श्री. विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे संपूर्ण नियोजन यशस्वीरित्या करण्यात आले.
रिपोर्टर