Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व्यापारी सेना विभाग क्रमांक 4 चे विभाग प्रमुख रवींद्र सिंग यांनी कूपर रुग्णालयात वाटले बँकेट आणि बिस्किटे.
मुंबई : प्रतिनिधी.
महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त मुंबईतील विविध विभागात विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्यातच अंधेरी पश्चिम विभाग क्रमांक 4. शिवसेना व्यापारी सेना विभागप्रमुख रवींद्र सिंग यांनी अंधेरी पश्चिम येथील कूपर रुग्णालयात बँकेट आणि बिस्किटांचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर असलेल्या निष्ठा मुळे रवींद्र सिंग यांनी अंधेरी विभागात सामाजिक स्तरावर लोक उपयोगी कार्यक्रम राबविले असून स्थानिक पातळीवर रवींद्र सिंग यांना कट्टर एकनाथ शिंदे समर्थक म्हणून संबोधिले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कूपर रुग्णालयात बँकेट वाटप कार्यक्रमात शिवसेना व्यापारी सेना मुंबई सचिव संदिप शिंदे, अंधेरी उपविभाग प्रमुख निकुंज कारीया, महिला शाखा प्रमुख आशा पवार, सरिता कुराडे, सुशांत माने बॉबी, अजित गोरूले उपस्थित होते.
रिपोर्टर