Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा नवा दणका,कुख्यात पुण्यातील गुंडा नंतर अमली पदार्थ तस्करांची परेड.
पुण्यातील गुंडगिरी विरोधात मंगळवारी 267 गुंडाची परेड घेवून गुन्हेगारांना तंबी देण्यात आली होती.
पुणे : वृत्तसंस्था
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार ॲक्शनमोड वर आहेत पुण्यातील गुंडगिरी विरोधात मंगळवारी 267 गुंडाची परेड घेवून गुन्हेगारांना तंबी देण्यात आली होती आणि आता अवैध धंदे व अंमली पदार्थ तस्कराची पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात परेड घेण्यात आली.
पुण्यातील गुंडांच्या परेड चा व्हिडिओ सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता. गुन्हेगारीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही, सोशल मीडिया वर व्हिडिओ किंवा रिल्स टाकायच्या नाही. राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल क्रमांक बदलल्यास नवीन नंबर पोलीस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला कळवावे, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.
रिपोर्टर