Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
शिवसेनेच्या युवासेना राज्य सोशल मीडिया समन्वयक पश्चिम महाराष्ट्र पदी महादेव सलवदे यांची नियुक्ती करण्यात आली.
सांगली : वृत्तप्रतीनिधी.
हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते मा एकनाथ शिंदे साहेब ( मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या आदेशानुसार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेने युवासेना कार्याध्यक्ष श्री पूर्वेश सरनाईक व श्री किरण साळी (युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया राज्य समन्वयक पदी श्री महादेव सलवदे यांची नियुक्ती करण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदार संघात गार्डी या गावा मधे राहणाऱ्या महादेव सलवदे 2014 पासून आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षा मध्ये कार्यरत आहे, शिवसेना पक्षात अनिल भाऊ यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध असून, युवासेना सांगली जिल्हा प्रमुख सचिन दादा कांबळे यांच्या सहकार्याने पुण्यात शिवसेना पक्ष पदाधिकारी यांच्या संपर्कात राहून सामाजिक, राजकीय कार्य केले आहे सदर कामाची दखल खा.डॉ श्रीकांत शिंदे व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक साहेब यांनी दखल घेऊन युवासेना सांगली जिल्हाप्रमुख सचिन दादा कांबळे व युवासेना सचिव किरण साळी साहेव यांच्या सहकार्य ने सोशल मीडिया राज्य समन्वयक पदाची जबाबदारी महादेव सलवदे यांना देण्यात आली.
पक्ष वाढीसाठी युवासेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचं सोशल मीडिया ची टीम तयार करुन त्यांच्या माध्यमातून सरकारच्या मार्फत केले जाणारे मंत्रिमंडळ निर्णय, जनतेसाठी राबविलेल्या योजना व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हीताचे निर्णय हे सोशल मीडिया च्या माध्यमातून पोहोचवण्याचा मानस असल्याचे महादेव सलवदे यांनी सांगितले. पुढील राजकीय वाटचाली करीता शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या...
रिपोर्टर