Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
प्रजासत्ताक दिवसा निमित्ताने अंधेरी विधानसभा शिवसेना व्यापारी सेनेच्या वतीने तृतियपंथी यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला.
शिवसेना व्यापारी सेना अंधेरी विधानसभा अध्यक्ष श्री रवींद्र र्सिंग यांनी सदर कार्यक्रमात तृतीयपंथी आणि मोठ्या संख्येने उपस्थित महिलांचा आदर सत्कार करून साड्या वाटप केल्या.
अंधेरी : प्रतिनिधी.
26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिवसा निमित्ताने शिवसेना व्यापारी सेनेचे विभाग क्रमांक 4 चे अध्यक्ष श्री रवींद्र सिंग यांच्या संकल्पनेतून प्रथमच अंधेरी पूर्व, जेबी नगर, गुरुद्वारा शेजारी शिवसेना व्यापारी सेना कार्यालयाच्या ठिकाणी तृतीय पंथी यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला.
सदर कार्यक्रमाला उपस्थित तृतीय पंथी आणि मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनाचा आदर सत्कार करून 250 साड्या वाटप करण्यात आल्या, या प्रसंगी शिवसेना स्थानिक विभाग प्रमुख श्री विजय घिवर , व्यापारीसेना मुंबई अध्यक्ष श्री हितेश आजणी, व्यापारी सेना मुंबई सचिव श्री राजेश झुनझुनवाला, श्री विनोद धोत्रे ( विभाग अध्यक्ष विभाग क्रमांक 5 ), श्री सुनील पार्टे ( विभाग अध्यक्ष विभाग क्रमांक 3 ), मोठ्या संख्येने शिवसेना तसेच व्यापारी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, स्थानिक रहिवाशी, महिलावर्ग उपस्थित होता.
या कार्यक्रम चे आयोजक श्री रवींद्र र्सिंग विभाग अध्यक्ष शिवसेना व्यापारी सेना ( विभाग क्रमांक 4 ) यांनी केले होते. श्री रवींद्र सिंग यांनी उपस्थित पदाधिकारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. समाजात समता बंधुता कार्यक्रमाच्या माध्यमातून केल्या बद्दल रवींद्र सिंग यांच्या वर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
रिपोर्टर