Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
सोलापूर जिल्ह्यातील रे नगर मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 30 हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरांचे लोकार्पण संपन्न झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आले.
सोलापूर : वृत प्रतिनिधी.
सोलापूर जिल्ह्यातील रे नगर मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 30 हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरांचे लोकार्पण आज संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आले.
याच सोहळ्यात अमृत 2.0 योजनेतील राज्यातील
4 महानगर पालिका आणि 3 नगर पालिकांच्या एकूण 1 हजार 201 कोटी रुपये खर्चाच्या 7 पाणीपुरवठा आणि एका मलनिस्सारण प्रकल्पांचे भूमिपूजन, पीएम स्वनिधी लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात निधी हस्तांतरण प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते या रे नगर वसाहतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. आज त्यांच्याच हस्ते देशातील सगळ्यात मोठ्या कामगार वसाहतीतील घरांचे चावी वाटप संपन्न होत आहे हीच मोदी गॅरेंटी आहे. रे म्हणजे आशेचा किरण, आज पंतप्रधान मोदी जी हेच गरिबांसाठी आशेचा किरण असून त्यांच्यामुळेच गरिबांचे जीवन प्रकाशमान झाले असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूचे लोकार्पण झाले. आज पंतप्रधानांच्या सहकार्यानेच राज्यात सर्वाधिक पायाभूत विकास प्रकल्प राबविले जात आहेत. मी स्वतः दावोस वरून कालच परतलो तिथे 3 लाख 53 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. दावोस येथेही पंतप्रधान मोदीजींचे नाव घेतले जात होते असे शिंदे म्हणाले
नरसय्या आडम मास्तरांनी या गरिबांना हक्काचे घर मिळावे यासाठी भगीरथ प्रयत्न केले असून त्यांनी केलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, विजयकुमार देशमुख, रे नगर हौसिंग फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आणि असंख्य कामगार उपस्थित होते.
रिपोर्टर