Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
ठाणे महापालिकेची दिवा, कळवा आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई..
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व वॉर्ड मध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव मनपा अधिकाऱ्यांचे आर्थिक फायद्यात अनधिकृत बांधकामना संरक्षण
ठाणे : प्रतिनिधी.
एकीकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व वॉर्ड मध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून मनपा अधिकाऱ्यांचे आर्थिक फायद्यात अनधिकृत बांधकामना संरक्षण दिले जात आहे मनपा वॉर्ड मध्ये अनधिकृत बांधकामे नियमित केली जात असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कायद्याची भीती न बाळगता मनपा कायद्याचे खुले आम उल्लंघन होत आहे आणि दुसरीकडे ठाणे महानगर पालिका ची अनधिकृत बांधकाम वर तोडक कारवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आहे.
ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत बुधवारी दिवा, कळवा आणि माजिवडा, मानपाडा प्रभाग समितीच्या क्षेत्रात कारवाई करण्यात आली. खान कम्पाऊंड, मुंब्रा देवी कॉलनी, शास्त्रीनगर, बाळकूम आणि कोलशेत येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.
अनधिकृत बांधकामांना थारा न देण्याचे धोरण ठाणे महापालिकेने स्वीकारले असून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार बुधवारीही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत, दिवा प्रभाग समितीतील खान कम्पाऊंड येथे तळ आणि पहिल्या मजल्याचे सुमारे 2500 चौ. फूटाचे बांधकाम पाडण्यात आले. त्याच भागात, तळ आणि दोन मजले असलेले सुमारे 3000 चौ. फूटांचे आरसीसी बांधकाम पाडण्यात आले. यात तळमजल्यावरील आठ दुकानेही रिक्त करण्यात आली. याशिवाय, 2000 चौ. फूटांचे प्लिंथपर्यंतचे आरसीसी बांधकाम तसेच, 4000 चौ. फूटांचे प्लिंथपर्यंतेच आरसीसी बांधकामही पाडण्यात आले. या संपूर्ण कारवाईसाठी तीन पोकलेन, एक जेसीबी, 40 कामगार आणि पोलिस व महापालिकेचे सुरक्षा रक्षक यांचे सहाय्य घेण्यात आले.
याच प्रभाग समितीतील मुंब्रा देवी कॉलनी येथील सुमारे 40 कॉलम असलेले आरसीसी प्लिंथचे बांधकाम आणि 25 कॉलम असलेले आणखी एक आरसीसी प्लिंथचे बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईसाठी दोन जेसीबी, 30 कामगार आणि पोलिस व महापालिकेचे सुरक्षा रक्षक यांचे सहाय्य घेण्यात आले.
कळवा प्रभाग समिती क्षेत्रात, प्रमिला हॉस्पिटलच्या मागे शास्त्रीनगर येथे सुमारे 2000 फूटांचे आरसीसी प्लिंथपर्यंतेच बांधकाम दोन जेसीबी, 30 कामगार यांच्या सहाय्याने पाडण्यात आले.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात, बाळकूम पाडा नं. 1 जोशी आळी येथील आठव्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. तर, कोलशेत येथे मरियाई नगरमधील चाळीतील दोन बैठ्या खोल्यांचे बांधकाम पाडण्यात आले.
रिपोर्टर