Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस संतोष आव्हाड यांचा महाराष्ट्र सदन दिल्ली येथे स्वामी विवेकानंद कर्मयोगी अवॉर्ड 2023 देऊन करण्यात आला सन्मान
दिल्ली : संदिप शिंदे
महाराष्ट्र सदन दिल्ली येथे कर्मयोगी अवॉर्ड 2023 देऊन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री. संतोष आव्हाड यांना सन्मानित करण्यात आले.
संतोष आव्हाड यांचा सामाजिक क्षेत्रात मोठे नाव असून भटके विमुक्त समाजासाठी 20 ते 22 वर्ष करत असलेल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सदन दिल्ली येथे पार पडलेल्या स्वामी विवेकानंदा स्मृती कर्मयोगी अवॉर्ड 2023 जनजाती गौरव पुरस्कार देऊन संतोष आव्हाड यांना सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात आध्यात्मिक मार्गदर्शक गुरुजी सन्माननीय आचार्य धर्मदेव जी, केंद्रीय कोयला राज्यमंत्री सन्माननीय श्री राजीव चंद्रशेखरजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्वामी जितेंद्रनंद सरस्वती महासचिव गंगा महासभा यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व मान्यवरांसोबत मंचावर उभे राहण्याचं भाग्य मला लाभले.!
माझ्या कार्याची दखल घेऊन अत्यंत प्रतिष्ठेच्या सन्मानासाठी माझी निवड त्याबद्दल कार्यक्रमाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक आंध्र प्रदेश भाजपा सहप्रभारी कार्यक्रमाचे आयोजक MY HONE INDIA FOUNDER आदरणीय सुनील जी देवधर साहेब यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो तसेच हा पुरस्कार मला भविष्यात अधिक प्रभावी कामगिरी करण्यासाठी ऊर्जा देत राहील, असे मंचावर उपस्थित मान्यवरांनी संबोधून संतोष आव्हाड म्हणाले.
राजकीय युवा नेतृत्व आणि सदर अवॉर्ड मिळाल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार महाराष्ट्र शासन समन्वयक प्रसाद लाड तसेच वरिष्ठ भाजपा नेते, पदाधिकारी इत्यादींनी संतोष आव्हाड यांना अभिनंदन पर पुढील सामाजिक कार्य वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या, स्थानिक मुंबई मित्रमंडळात उत्साहाचे वातावरण असून संतोष आव्हाड यांच्या वर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
रिपोर्टर