Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
नागपुर महानगरपालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक जगतराम सिन्हा आणि बंडू तळवेकर यांनी काल रामगिरी या निवासस्थानी येऊन आठशेहून अधिक कार्यकर्त्यांन सोबत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
नागपूर : वृत्तसंस्था
नागपुर महानगरपालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक जगतराम सिन्हा आणि बंडू तळवेकर यांनी काल रामगिरी या निवासस्थानी येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी यांच्यासह त्यांच्या आठशेहून अधिक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना, राज्यातील महायुती सरकार हे सर्व सामान्यांच्या मनातील सरकार आहे. हे सरकार अस्तित्वात आल्यापासून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला अशा समाजघटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. शेतकऱ्यांसाठी 44 हजार कोटी रुपयांची मदत करणारे हे पहिलेच सरकार असून अवकाळी पाऊस, गारपीट असे नैसर्गिक संकटे आले तरीही आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे आहोत. महिलांना बचत गट तसेच एसटी मध्ये 50 टक्के सवलत देऊन महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
या आधी शिवसेनेत विदर्भाला मान दिला नाही आणि स्थानही दिले गेले नाही. आज मात्र नागपूर शहराच्या 40 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेत पक्षप्रवेश झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विदर्भात संघटना वाढावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करू असे शिंदे यांनी यावेळी बोलताना आश्वस्त केले.
यावेळी राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रताप सरनाईक, आमदार आशिष जयस्वाल, माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, नागपूर शहरप्रमुख मंगेश काशीकर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर