Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत "नौदल दिन 2023" चा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. सिंधुदुर्गच्या विजयी भूमीवर नौदलदिन साजरा करणे हा अभिमानाचा क्षण : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ही गौरवाची बाब असून भारतीय नौदलाच्या ध्वजामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.
सिंधुदुर्ग : वृत्तसंस्था
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत "नौदल दिन 2023" चा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. सिंधुदुर्गच्या विजयी भूमीवर नौदलदिन साजरा करणे हा अभिमानाचा क्षण आहे. हा किल्ला भारतातील प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.
कार्यक्रमास राज्यपाल रमेशबैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा देऊन देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.
मालवण, तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला, आणि राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण व ऐतिहासिक भारतीय नौदल दिनामुळे देशातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले आहे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
छत्रपती शिवाजीमहाराज बळकट नौदलाचे महत्त्व जाणून होते. नौदल अधिकाऱ्यांच्या गणवेशावरील नवीन मानचिन्ह शिवाजी महाराजांचा वारसा प्रतिबिंबित करतील. सशस्त्र दलांमध्ये आपल्या नारी शक्तीचे सामर्थ्य वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ही गौरवाची बाब असून भारतीय नौदलाच्या ध्वजामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.
महाराष्ट्राची पहिली नौदल अधिकारी म्हणून श्रीमती देवस्थळी यांची नेमणूक झाली आहे याचा महाराष्ट्राला अभिमान असून आत्मनिर्भरतेचा छत्रपती शिवाजीमहाराज यांनी दिलेला वारसा आणि वसा आपण सर्वजण पुढे घेऊन जात आहोत. : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
#नौदलदिन२०२३
#NavyDay
रिपोर्टर