Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे- परशूराम औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज लिमिटेड कंपनीच्या प्लांटचा भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला..
कोका कोलाच्या कोकणातील या नवीन प्लांटमध्ये कंपनीची 60 उत्पादने उत्पादित होणार आहेत. शासनाकडून या कंपनीमध्ये स्थानिक नागरिकांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल : एकनाथ शिंदे.
रत्नागिरी : वृत्तसंस्था.
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे- परशूराम औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज लिमिटेड कंपनीच्या प्लांटचा भूमीपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 2500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभ्या रहात असलेल्या या प्लांटच्या माध्यमातून 2 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
कोका कोलाच्या कोकणातील या नवीन प्लांटमध्ये कंपनीची 60 उत्पादने उत्पादित होणार आहेत. शासनाकडून या कंपनीमध्ये स्थानिक नागरिकांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
कोकणच्या जनतेवर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच प्रेम केलं आहे, परंतु काही लोकांनी केवळ कोकणी माणसाच्या जीवावर राजकारण केले, मात्र आम्ही केवळ राजकारणासाठी कोकणी माणसाचा वापर करणार नाही तर इथे उद्योगधंदे आणून त्यांना रोजगार देणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
यापुढेही कोकणात अनेक उद्योग येणार असून कोकणाला विकासाकडे घेऊन जाणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या सहकार्याने राज्यात उद्योग वाढत असून गुंतवणुकीसाठी आजही उद्योजकांची पहिली पसंती महाराष्ट्राला असल्याचे यावेळी शिंदे यांनी निक्षून सांगितले.
कोकणच्या विकासासाठी घोषणा करण्यात आलेल्या कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल. मुंबई- गोवा ग्रीनफिल्ड रस्ता आपण तयार करत आहोत. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू असून त्यांना नक्की मदत दिली जाईल असेही यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, हिंदुस्थान कोका कोला ब्रेव्हरेज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पाब्लो रोड्रिक्स, मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू प्रियदर्शी तसेच सर्व स्थानिक अधिकारी शिवसेनेचे सर्व स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच हजारो नागरिक उपस्थित होते.
रिपोर्टर