Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
नवी दिल्ली येथे केंद्रीय मागासवर्ग आयोगाशी झालेल्या चर्चेनंतर छत्रपती संभाजीराजे यांचा पत्रकारांशी संवाद
स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांची केंद्रीय मागासवर्ग आयोगासोबत बैठक संपन्न....
मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला सोबत घेवून केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेवून सविस्तर चर्चा केली.
मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे तसेच मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर मागास सिद्ध करण्यासाठी आमच्या विनंती नुसार केंद्रीय मागासवर्ग आयोगाने राज्य मागासवर्ग आयोगाला मार्गदर्शक सूचना द्याव्यात अशी मागणी देखील केली.
1950 पर्यंत मराठा समाजाचा Intermediate Community मध्ये समावेश होता, या मुळे त्या वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळत होते या मुद्द्याकडे लक्ष वेधत असताना एखाद्या राज्यात अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यासाठीचे निकष हे 1992 सालचे आहे. 1992 सालचे निकष हे आज लागू होणार नाही त्यामुळे हे निकष सद्य परिस्थिती नुसार बदलण्यात यावे अशी मागणी देखील केली.
तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण दिले जाते. आता तेलंगणा आणि कर्नाटक राज्य सरकारने तेथील मराठा समाजाला केंद्राच्या यादीत स्थान देण्याची मागणी केली असून तेथील मराठा समाजाला केंद्राच्या यादीत देखील स्थान मिळण्याची शक्यता आहे. तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण मिळू शकत असेल तर महाराष्ट्रात का नाही ? असा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला.
तसेच मराठा समाज हा सामाजिक मागास आहे, मात्र मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक प्रतिनिधित्व तपासताना 100% पैकी किती ? असा फॉर्म्युला वापरायला हवा होता, मात्र त्या ऐवजी 48% खुल्या प्रवर्गातून मराठा किती ? असे निकष लावल्यामुळे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या विषयी आम्ही केंद्रीय मागासवर्ग आयोगाशी चर्चा केली व हा निकष बदलण्यासाठी आपण देखील प्रयत्न करावा अशी मागणी केल्याची माहिती देखील पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी राज्यभर संघर्ष करत असताना त्यांच्या प्रामाणिक संघर्षाला व गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला कायदेशीर बळ मिळावे यासाठी केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे आम्ही कायदेशीर मागण्या केल्या असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती पाहता मराठा आरक्षण या विषयात केंद्र सरकारने देखील लक्ष घालायचे हवे, केंद्रीय आयोगाला देखील घटनात्मक दर्जा असल्यामुळे त्यांनी देखील या विषयी लक्ष घालावे व गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी योग्य पाऊल उचलावे असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.
यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्या समवेत मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे, स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर, विनोद साबळे, रघुनाथ चित्रे, संजय पवार, गणेश सोनवणे, राहूल शिंदे, महादेव तळेकर, राहूल गावडे, विलास पवार, महेश गवळी यांच्यासह मराठा समाजाचे अभ्यासक व पदाधिकारी उपस्थित होते.
https://youtu.be/dJs88_z_S4o?feature=shared
रिपोर्टर