Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
सोसायटी वादातून पोलिसांसह पत्नीला मारहाण करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांसह आठ जणांवर गुन्हा दाखल.
मिरा रोड येथील परप्रांतीय स्वतःला बाहुबली समजणाऱ्या भाजपा कार्यकर्ताची सोसायटी मध्ये दादागिरी.
मिरा रोड : वृत्तसंस्था
एकीकडे मराठा आरक्षणावर राजकीय वातावरण तापले असून दुसरीकडे परप्रांतीयांची दादागिरी वाढल्याचे चित्र राज्यात दिसत आहे गेल्या काही महिन्यात परप्रांतीयांच्या दादागिरीच्या घटना वाढल्या असता मिरा रोड येथे चक्क परप्रांतीय कडून पोलिसांसह पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली असून स्थानिक मराठी समाजात परप्रांतीय विरोधात रोष वाढत आहे.
मिरा रोड येथील सोसायटी मध्ये राहणाऱ्या भाजपा कार्यकर्ता आणि कुटुंबीयांनी पोलीस दलातील पोलिसांसह पत्नीला मारहाण केली मिळालेल्या माहितीनुसार स्वतःला बाहुबली समजणाऱ्या अमित सिंह आणि आठ जणांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोरिवली पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत असलेले प्रदीपकुमार बाबर हे मिरा रोड येथे हटकेश भागातील राज एक्स्कटोठिका या सोसायटीत राहतात. बुधवारी रात्री बाबर ड्युटी वरून घरी जाताना इमारतीच्या गेटवर अमित सिंह याने बाबर यांना रागात बघत असता बाबर यांनी विचारले असता अमित ने मोबाईल वर फोन करून अभिजित उर्फ घोडा यास बोलाविले थोड्याच वेळात अमित सिंह याचे कुटुंब आणि काही अनोळखी व्यक्ती या सर्वांनी बाबर यांना मारण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार अमित सिंह हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असून स्वतःला बाहुबली असल्याचे सांगून दादागिरी करत असून भाजपा चा कार्यकर्ता आहे त्याने भाजपचा फलक सोसायटीच्या आवारात लावला यावर राजकीय फलक काढण्यासाठी सोसायटी कमिटीने वारंवार सागितले पण सिंह हा कमिटीला न जुमानता रहिवाश्यांना दादागिरी, धमकावणी सिंह आणि परिवार करत असतात सिंह याचे वडील सुरेंद्र सिंह हे सोसायटीचे माजी अध्यक्ष होते त्यांनी केलेल्या गैव्यवहारप्रकरणी रहिवाश्यांनी गृहनिर्माण संस्था निबंधक यांच्या कडे तक्रार केली त्यामुळे सुरेंद्र सिंह यांना पदावरून काढण्यात आहे तेव्हा पासून अमित सिंह आणि परिवार सोसायटीत दादागिरी, धमकावणी, मारामाऱ्या इत्यादी प्रकार करत आहेत अमित सिंह यांची मुजोरी इतकी वाढली की त्याने चक्क पोलिसाला मारहाण केली सदर घटने मुळे स्थानिक रहिवाशी आणि मराठी भाषिक जनतेत रोष वाढला असून अमित सिंह आणि परिवार कायदेशीर कारवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. काश्मीर पोलीस ठाणे या घटनेची चौकशी करत आहे.
रिपोर्टर