Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
मुंबई : संदिप शिंदे.
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छता आणि प्रदूषण या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी महापालिका आयुक्तांना दिले.
मुंबईतील प्रमुख, रस्ते, पदपथ, चौक याठिकाणी नियमित स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी अधिकचे मनुष्यबळ देखील लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहर व परिसरातील प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना सुचविल्या आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.
मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मोहिम स्वरूपात काम करतानाच प्रत्येक भागात रस्ते, पदपथ, गटारं साफ करण्यासाठी दररोज 50 ते 100 कामगार साफसफाईचे काम करतात अशा ठिकाणी अन्य भागातले कामगार तेथे बोलावून साधारणता एक हजार कामगारांकडून त्याभागाची साफसफाई करून घ्यावी, अशा प्रकारे मुंबईतील प्रत्येक भागात डिसेंबर महिन्यापासून मोहिम स्वरुपात काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी मुंबईतील प्रदुषण नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
मुख्य सचिव मनोज सौनिक, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.
रिपोर्टर