Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुख्यमंत्री निवासस्थान "वर्षा" बंगल्यावर दुर्धर आजारांवर मात केलेल्या 50 लहान मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरी केली आगळी वेगळी दिवाळी..
मुंबई : संदिप शिंदे.
पाठीवरती हात ठेवूनी नुसतं लढ म्हणा... ही भावना आज वर्षा बंगल्यावर खास आमंत्रित करण्यात आलेल्या प्रत्येक बालकाच्या आई वडिलांनी व्यक्त केली. सर, तुमच्या मदतीमुळे आम्ही आजारांविरुद्धची लढाई जिंकली आहे असे मनोगत प्रत्येक पालकाने साश्रू नयनांनी व्यक्त केलं.
निमित्त होते, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अर्थसहाय्याने हृदयशस्त्रक्रिया, कॅन्सर, जन्मतः मूकबधिर ( कोकलीयर इंप्लान्ट शस्त्रक्रिया ), बोन मेरो ट्रान्सप्लांट आदी दुर्धर आजारांवर मात केलेल्या 50 लहान मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत साजऱ्या झालेल्या आगळ्या वेगळ्या दिवाळीचे.
दिवाळी हा कौटुंबिक कार्यक्रम असून गेल्यावर्षी याच ठिकाणी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली होती. आता आपल्या सोबत दिवाळी साजरी करीत आहे. सर्वसामान्यांसोबत राहून त्यांच्या अडीअडचणीत मदत करण्याचे काम गेले कित्येक वर्ष आम्ही करीतच आहोत. तेच काम आम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व महात्मा फुले जनआरोग्यसारख्या विविध योजनांतून सर्वसामान्यांसाठी करीत असल्याचे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी या मुलांच्या आई-वडिलांनी "मुख्यमंत्री सहायता कक्षा" तून मिळालेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. त्यासोबत या मुलांसोबत फराळ घेऊन दिवाळी साजरी केली.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, एचसीजी (HCG) मानवता कॅन्सर हॉस्पिटल, नाशिकचे डॉ.राज नगरकर, ठाणे येथील भूमकर हॉस्पिटलचे डॉ.आशिष भूमकर, यशश्री हॉस्पिटल सांगलीचे कोकलीयर इंप्लान्ट शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.सुधीर कदम, ज्युपिटर हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ.आशुतोष सिंह, डॉ.श्रीनिवास सर, कोकलीयर इंप्लान्ट शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.अजय ठक्कर, डॉ.उप्पल सर, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.
रिपोर्टर