Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मल्हार इंटेरियरस संस्थापक डॉ. दिलीप नागरे भारत बिजनेस अवॉर्ड २०२३ ने सन्मानित..
मीरा रोड : संदिप शिंदे
नाशिक येथील रेसिल ग्रुप च्या वतीने विविध सामाजिक, व्यावसायिक, राजकीय, आर्थिक, कॉर्पोरेट क्षेत्रातील स्वतःच्या कर्तुत्वावर समाजात अव्वल स्थान प्राप्त करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार मिरा रोड येथे नुकताच करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते, मोटिवेशनल स्पीकर तसेच इंटेरियर आणि बांधकाम क्षेत्रात गेल्या 17 वर्षापासून कार्यरत असलेले डॉ. दिलीप शांताराम नागरे यांना यंदाचा भारत बिजनेस अवॉर्ड 2023 मराठी सिनेतारका सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला. मिरारोड येथील भारतरत्न लता मंगेशकर सभागृहात उत्साहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
सर्वसामान्य वर्गातील लोकांना इटरियार्स च्या माध्यमातून प्रशस्त घराला घरपण कमी वेळात देण्याचा हातखंडा असलेल्या डॉ दिलीप नागरे यांनी कमी काळात व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सरकारी निमसरकारी कार्यालये, इमारती, सोसायटी, विविध व्यावसायिक कार्यालयीन अंतरसजावट कामे डॉ दिलीप नगारे यांच्या मल्हार इंटेरियर च्या माध्यमातून केली जातात.
डॉ. दिलीप नगारे यांच्या कामाची दखल घेत विविध क्षेत्रातील संस्थांच्या कार्यक्रमात डॉ नगारे यांना पुरस्कार, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा भारत बिजनेस अवॉर्ड 2023 देऊन डॉ. दिलीप नगारे यांना सन्मानित केल्याने सर्व स्तरावरून डॉ. नागरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक, राजकीय, व्यावसायिक स्तरातील मान्यवरांकडून डॉ. नागरे यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.
रिपोर्टर